मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. महाराष्ट्राची आणि देशाची फसवणूक करणारे दोघे ठग कुठे आहेत ? हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या आणि मेहूल चोकसी याची जुनी दोस्ती आहे. मेहूल चोकसी जिथे आहेत, तिथे तरी सोमय्या गेले नाहीत का ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या लोकांनी जनतेचा पैसा लुटला आहे. कारवाईच्या भीतीने हे लोक देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता वाटत आहे. यांची माफिया टोळी आहे. या प्रकरणावर भाजप काहीही बोलत नाही. विक्रांत प्रकरणी घोटाळ्याला भाजपचे समर्थन आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती राज्य आणि देशव्यापी आहे. अजून काही प्रकरणे बाहेर पडतील असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ?
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022
पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध
शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला ही चुकीची घटना असून या हल्ल्यामागील सूत्रधार कोण याचा शोध घेतला पाहिजे. हल्लेखोरांना माफ करुनये असे राऊत म्हणाले.