पुणे- शिक्रापूर येथे लक्झरी बस आणि स्विफ्ट कार यांचा भीषण अपघातानंतर बस उलटून थेट एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
विशाल सासवडे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कार चालकाचे नाव आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे-
दीपक नरेंद्र अगरवाल वय २८
माणिकचंद चिमणलाल जैन वय ६७
हरिषकुमार विजयनंद दुबे वय ३३
शरयू मनिश जाखेटे वय २२
प्रकाश आप्पासाहेब तुर्मतमक वय ६४
पुजा किसन खैरनार वय २९
मुकेश वेदप्रकाश सुरवसे वय २८
शीतल दीपक चौघुले वय ३३
कुषाग्र दिपक चौघुले वय 8
नागेश हरिभाऊ शिंगाडे वय ४८
अशोक पुरुषोत्तम बोरसे वय ६५
कल्पना अशोक बोरसे वय ६०
तेहरिम सज्जाद अहमद मोमिन
फायझा फरहद षोएब अहमद मोमिन वय २१
कृतिका मधुकर पाटील वय २३
प्रणीत गोकुळ बागुल, वय ३४
समर्थ मिलींद वैद्य वय २१
रिटा संजय भग भगत ४०
सौम्या संजय भगत वय १५
संदीप भरत षटकर वय ३५
नंदिनी राजसाहेब वाघ वय २७
मोहम्मद युनुस इत्तेखार वय २४
सोमनाथ गोरक्ष शेंडे वय ३२
सोमनाथ मधुकर भोसले वय ४६
राजा भाईसाहेब सिंग वय ४२
जखमींपैकी सोमनाथ गोरक्ष शेंडे, सोमनाथ मधुकर भोसले व राजा भाईसाहेब सिंग या तिघांची प्रकृती गंभीर आहे.
नेमकं काय घडलं?
शिक्रापूर ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच १४ एच यु २२६५ हि लक्झरी बस पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने येत असताना अहमदनगर बाजूने आलेली एम एच १२ पि एन ६७२८ हि स्विफ्ट कार अचानकपणे दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूला येत लक्झरी बसवर आदळली यावेळी वेगाने आलेली लक्झरी बस अचानकपणे शेजारील रॉयल पॅलेस हॉटेल समोर असलेल्या विजेच्या खांब व हॉटेलच्या फलकाला धडकून उलटून थेट हॉटेल मध्ये घुसली यावेळी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एन एच १२ एल व्ही ५११५, एन एच ०१ डी के १८०६, एन एच १२ सि के ८५६८ या तीन वाहनांना देखील लक्झरी धडकल्याने या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.