भर व्यासपीठावरून शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजारांचे बंडल लांबवले

570 0

सांगली – ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल गायब केले. ही घटना सांगलीमध्ये घडली. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.

सांगलीच्या स्टेशन चौकात ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन स्टेजवर जाऊन चोरट्याने चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील
50 हजारांचे बंडल हातोहात लांबवले. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Share This News

Related Post

Yawatmal News

Yawatmal News : मुसळधार पाऊसामुळे घराची भिंत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
यवतमाळ : राज्यात सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यामुळे काही ठिकाणी…

वाढदिवस साजरा करताना हटकल्याने टोळक्याकडून ज्येष्ठ नागरिकाचा खून

Posted by - June 28, 2022 0
हिंजवडी- वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना शांत राहण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. बावधन…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - April 14, 2022 0
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच…

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड ; बॉलीवूडवर शोककळा

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल…

भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांची वसंत मोरे यांनी घेतली भेट

Posted by - April 6, 2022 0
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले. त्यानंतर हा भोंग्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *