खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल होण्यास नकार

170 0

मुंबई- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिलाय. मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत.

छत्रपती संभाजी राजे यांचे ब्लड प्रेशर, शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टर म्हणाले की, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कालपासून संभाजीराजे यांना तीव्र डोकेदुखीचा त्रासही जाणवत आहे. डॉक्टरांनी कालच सलाइन लावण्याचा सल्ला दिला. मात्र संभाजीराजेंनी सलाईन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचं समजतंय. आत्ता थोड्या वेळापूर्वी पुन्हा एकदा आझाद मैदानावर रुग्णवाहिका दाखल झाली आहे.

हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. तो सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजे यांच्या ट्वीटर हँडलवरूनही तसे ट्वीट करण्यात आले आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झालीय. या बैठकीसाठी राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीत आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

Posted by - July 29, 2022 0
पुणे: ओबीसी राजकीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ची आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22…

पहिल्या पतीला सोडलं, केलं दुसरं लग्न; तिसऱ्यानेच पाठवले पत्नीला तसले व्हिडिओ, मोबाईल पाहून पतीची पायाखालची जमीनच सरकली…

Posted by - March 8, 2023 0
उत्तराखंड : हल्द्वानी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने पहिलं लग्न केलं होतं. पण हे पहिलं लग्न…

पीएनबी घोटाळा: नीरव मोदीचा हस्तक सुभाष शंकर भारताच्या ताब्यात

Posted by - April 12, 2022 0
नवी दिल्ली- पीएनबी घोटाळ्यात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरव मोदीचा खास व्यक्ती असलेल्या सुभाष…

CNG वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात CNG मिळणार नाही ? वाचा सविस्तर

Posted by - October 15, 2022 0
पुणे : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दार पाहता सीएनजीचा वापर वाढला आहे. पुण्यात जवळपास दोन लाख CNG वर धावणारी वाहने…

सिंहगड रोड परिसरातील बुद्ध विहार समोर ड्रेनेज लाईन तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित; नागरिक हैराण

Posted by - December 3, 2022 0
पुणे : पानमळा वसाहत सिंहगड रोड येथील आम्रपाली बुद्ध विहार समोर ड्रेनेज लाईन सातत्याने तुंबून परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *