सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हृदयाला स्पर्श करणाऱ्या या व्हिडिओमध्ये आई आपल्या लेकराची किती काळजी घेते. आपल्या काळजाच्या तुकड्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे कसे जपते. हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ आहे एका सिंहिणीचा आणि तिच्या दोन पिल्लांचा.
आपल्या मुलांना संकटात सापडलेले पाहून कोणतीही आई लगेच धावून येते. या व्हिडिओमध्ये सुद्धा सिंहीण आणि तिची दोन पिल्ले नदीच्या काठावर उभे आहेत. त्याचवेळी दोन्ही पिल्ले खड्ड्यात पडतात. खड्यात पडलेल्या पिल्लाना वर आणण्यासाठी ती सिंहीण खाली उतरते आणि आपल्या जबड्यात एका पिल्लाला अलगदपणे उचलून वर काढते.
Whenever you are down, have faith in your mother💕 pic.twitter.com/7QJeowR1c4
— Susanta Nanda (@susantananda3) February 27, 2022
हा मनमोहक व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 21 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या क्लिपसोबत त्याने एक मोहक कॅप्शनही लिहिले आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.