भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरिकांना कीव सोडण्याचे आवाहन

572 0

युक्रेन- रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही सुरु आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना तातडीने कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना कीवमधून निघून जाण्यास सांगण्यात आलं आहे.

मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात ट्विट केलं आहे.”रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला ? विध्वंसाचा भयंकर VIDEO आला समोर शक्यतो उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही वाहनांद्वारे तात्काळ कीव सोडा”, असा सल्ला दूतावासाने दिला आहे. कीवमधील हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.रशिया-युक्रेन युद्धाचे भयानक व्हिडिओ सतत समोर येत आहेत.

आता युक्रेनचे राजदूत ओक्साना मार्कोव्हा यांनी नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात प्रतिबंधित असलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला आहे असा दावा त्यांनी केला आहे. जिनिव्हा करारानुसार यावर बंदी आहे. व्हॅक्यमु बॉम्बला सर्वात मोठा बॉम्ब म्हणजेच फादर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हटलं जातं. या बॉम्ब हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान युक्रेनवर रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत. युक्रेनच्या खारकावमध्ये रशियाने हल्ला केला असून शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकाला मोठा फटका बसला आहे. या हल्लामुळे अनेक गाड्यांचा अक्षरशः चिथडे उडाले आहेत .यावरुनच लक्षात येते की हल्ल्याची भीषणता किती जास्त आहे.

Share This News
error: Content is protected !!