‘कच्चा बादाम’ गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या गायकाचा अपघात, गंभीर जखमी

375 0

पश्चिम बंगाल- ‘कच्चा बादाम’ फेम गायकाचा अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला आहे. ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर भुबनला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भुबनच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. भुबनने नुकतीच एक कार खरेदी केली. भुबन कार चालवायला शिकत होता. तेवढ्यातच हा अपघात झाला. भुबन बड्याकर पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचं काम करतो. शेंगदाणे विकता विकता तो कच्चा बादाम हे गाणं गायचा. सोशल मीडियावर हे गाणं लोकप्रिय होऊन व्हायरल झालं. ज्यानंतर भुबन बड्याकर लोकप्रिय झाला.

भुबन बड्याकर हा मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. दुबराजपूर ब्लॉक अंतर्गत कुरलजुरी गावात त्याचं घर आहे. भुबन याच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे. भुबन वाड्याकर यांची ख्याती म्हणजे आता ते कुठेही गेले की लोकांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा असतो. भुवनच्या ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर लाखो यूजर्सनी रील्स केले आहेत. सध्या दुखापत जास्त झाली असल्याने प्रकृती चिंताजनक आहे.

Share This News

Related Post

कोल्ड्रिंक पिणे थांबवा आणि ताक प्या, ताक पिण्याचे फायदे काय आहेत ?

Posted by - April 1, 2022 0
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत…

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी अध्यक्षपदी सतीश काळे

Posted by - February 4, 2022 0
पिंपरी- मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सतीश काळे यांची निवड करण्यात…
Crime

वडगाव मावळ कोर्टातील सरकारी वकिलांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Posted by - April 4, 2022 0
आज वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांच्या विरुद्ध एका नवोदित वकिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्या…

कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात स्वराज्यपताका

Posted by - April 2, 2022 0
पुणे- कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पुणेच्या वतीने भव्य स्वराज्य पताका फडकाविण्यात आली. यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी काम केलेल्या विविध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *