राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा

238 0

मुंबई- ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेल्या धडक मोर्चावेळी माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. 

चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या आक्षेपार्ह विधानाबाबत चंद्रकांत पाटील यांना लेखी खुलासा करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने आज दिले. हा खुलासा करण्यासाठी त्यांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

महिला आज स्वकर्तृत्वाने शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य महिलांच्या आत्मसन्मानला ठेच पोचवणारे आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल, याचे भान त्यांनी ठेवावे, असे आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!