बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

367 0

अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुपरस्टार रणवीर सिंह यांच्यासह संगीतकार ए.आर. रहमान तसेच क्रिकेट जगतातील मोठमोठ्या व्यक्तिमत्वाचा समावेश असणार आहे. एकूण यंदाचा आयपीएल 2022 चा समारोप दणक्यात होणार आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आधीच फायनलमध्ये पोहचलाय. तर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. फायनलचा सामना सुरु होण्याआधी एक दमदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी तब्बल 6 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला आमदार लक्ष्मण जगताप यांची उणीव जाणवत राहील – विरोधी पक्षनेते अजित पवार

Posted by - January 3, 2023 0
मुंबई : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण

Posted by - May 5, 2022 0
मुंबई-राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा…

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

Posted by - June 2, 2022 0
मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील…

इंग्रजांच्या गुलामीत खितपत भारतास ‘प्रजासत्ताक’ बनवण्यात यशस्वी नेतृत्व दिल्यानेच महात्मा गांधी जननायक-  गोपाळ तिवारी

Posted by - July 24, 2022 0
पुणे:गुलामीच्या पारतंत्र्यातील खितपत देशास ‘भारतीय प्रजासत्ताक’ अर्थात प्रजेची लोकशाहीरुपी-सत्ता बनवण्याचे महत् कार्य गांधींनी ‘सत्य व अहिंसेच्या’ तत्वांवर केल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचे ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *