महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

263 0

सांगली- जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावचा सुपुत्र 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्याच्याच गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांना साश्रू नयनाने निरोप दिला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना रोमित चव्हाण यांना वीरमरण आले.

शनिवारी सकाळी चेरामार्ग येथे दहशतवाद्यांना रोखताना झालेल्या गोळीबारात रोमित हे शहीद झाले. या घटनेचे वृत्त शनिवारी दुपारी गावात समजले. रोमित यांचे वडील वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता तसेच रोमित यांच्या बहीण यांच्या सांत्वनासाठी अनेकांनी धाव घेतली. याच दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारणाकाठी अंत्यसंस्कारासाठी मैदान तयार केले. विशेष चबुतरा उभारला आहे. सोमवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रविवारी शिगाव येथे गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवत अभिवादन केले.

Share This News

Related Post

बेळगाव महाराष्ट्राचं की कर्नाटकचं…? आज होणार फैसला ; मराठी भाषिकांचे लक्ष

Posted by - August 30, 2022 0
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सुरू असलेला बेळगाव, कारवार, निपाणी हा कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यासाठी अनेक वर्षांचा लढा सुरू…

सचिन वाझेबाबत परमबीर सिंग यांनी ईडीच्या जबाबामध्ये केला आणखी एक आरोप

Posted by - February 3, 2022 0
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात पुन्हा एक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.…

आषाढी एकादशीच्या दिवशी ‘असे’ करा व्रत,नक्कीच होईल फलप्राप्ती

Posted by - July 8, 2022 0
आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच ‘आषाढी एकादशी’चे महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे.आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी,देवपोधी एकादशी,महाएकादशी,हरिशयनी एकादशी या नावाने…

Breaking News ठरले ! एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले ? हे असणार बंडखोर आमदारांच्या गटाचे नाव ?

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांच्या बंदमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची टांगती तलवार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक…
Devendra Kumar Upadhye

Devendra Kumar Upadhye : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्तीपदी न्या. देवेंद्र उपाध्याय यांची नियुक्ती

Posted by - July 25, 2023 0
मुंबई : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय (Devendra Kumar Upadhye) यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *