संतापजनक ! दोन अल्पवयीन मुलांचे चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमधील घटना

630 0

औरंगाबाद- खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी पीडित मुलगी कॉलनीत खेळत होती. शेजारीच राहणाऱ्या 13 आणि 10 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला गच्चीवर नेले. तिथे या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. मात्र काय घडलंय हे न कळाल्यामुळे मुलगी रडतच आईकडे आली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने आईला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आईने त्यांच्या कानावर हा प्रकार घातला.

मुलीला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा साळुंके यांनी चिमुकलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

vinod chavan police

Dharashiv News : पत्नीची हत्या करणाऱ्या ‘या’ सहायक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप; राज्यभर गाजले होते प्रकरण

Posted by - May 9, 2023 0
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण…

ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्त्या ; दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन

Posted by - March 10, 2022 0
देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेऱ्यांचे कल पाहाता भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी…

#VIRAL VIDEO : लग्नाच्या मंडपात नवरदेवाने केले असे कृत्य, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही

Posted by - March 27, 2023 0
व्हायरल व्हिडिओ : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. यासाठी सोशल मीडियावर दररोज लग्नाशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यातील…

पुण्यात नायलॉन मांजामुळे 2 पोलीस कर्मचारी जखमी; मोठी दुर्घटना टळली

Posted by - January 17, 2023 0
पुणे : मकर संक्रांतीचा सण जसजसा जवळ येत जातो तसा नायलॉन मांजाचा वापर करू नका, हे नियमबाह्य असून देखील दरवर्षी…
Crime

शहरात दुचाकीस्वार चोरटयांचा धुमाकूळ एकाच रात्री सात ठिकाणी नागरिकांना लुटले

Posted by - May 7, 2022 0
पुणे- पुणे शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरटयांनी धुमाकूळ घातला असून पोलीस या चोरट्याना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. एकाच दिवसात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *