महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

3095 0

सांगली- जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावचा सुपुत्र 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्याच्याच गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी त्यांना साश्रू नयनाने निरोप दिला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना रोमित चव्हाण यांना वीरमरण आले.

शनिवारी सकाळी चेरामार्ग येथे दहशतवाद्यांना रोखताना झालेल्या गोळीबारात रोमित हे शहीद झाले. या घटनेचे वृत्त शनिवारी दुपारी गावात समजले. रोमित यांचे वडील वीरपिता तानाजी चव्हाण, वीरमाता तसेच रोमित यांच्या बहीण यांच्या सांत्वनासाठी अनेकांनी धाव घेतली. याच दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वारणाकाठी अंत्यसंस्कारासाठी मैदान तयार केले. विशेष चबुतरा उभारला आहे. सोमवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. रोमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रविवारी शिगाव येथे गावकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवत अभिवादन केले.

Share This News
error: Content is protected !!