मोठी बातमी : बाराव्या फेरीनंतर 45 हजारांहून जास्त मतं मिळवत ऋतुजा लटके विजयी

348 0

मुंबई : मतमोजणीच्या बाराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 45 हजारांहून अधिक मतं मिळाल्याने त्या विजयी ठरल्या आहेत. या फेरीनंतर लटके यांना 45 हजार 211 मतं मिळाली तर नोटाला 8 हजार 887 मतं मिळाली आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे राजकारणात अनेक चाड उत्तर महाराष्ट्राने पहिले आहेत. पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीदरम्यान भाजपवर उमेदवार मागे घेण्याबाबतचा दबाव वाढल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला होता.

भाजपने उमेदवार मागे घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. तरीही भाजप व्यतिरिक्त इतर उमेदवार देखील रिंगणात होतेच. बाराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ४५ हजारांहून अधिक मतं मिळाल्याने त्या विजयी ठरल्या आहेत. या फेरीनंतर लटके यांना ४५ हजार २११ मतं मिळाली तर नोटाला ८ हजार ८८७ मतं मिळाली आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide