BIG BREAKING : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ईडब्ल्यूएस आरक्षण वैध

264 0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 10 टक्के आर्थिक आरक्षण म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हे आरक्षण कायम असणार असून त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे ईडब्ल्यूएस आरक्षण

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS – Economically Weaker Section), ईडब्ल्यूएस किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग हे भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात आलेले एक आरक्षण आहे. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आले, आणि या आरक्षणाचा लाभ केवळ खुल्या किंवा सामान्य (open or general) प्रवर्गातील उमेदवारांनाच होतो; अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यासारख्या आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. २०१९ मध्ये, भारतीय संसदेने १०३वी घटनादुरुस्ती करून हा कायदा लागू केला आहे.

ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असाही निकष आहे. तसेच घर कसे असावे, याचे शहर आणि गावात काही वेगवेगळे निकष आहेत.

अनुसूचित जाती (SC) – 15 %
अनुसूचित जमाती (ST) – 7.5 %
इतर मागास वर्ग (OBC) – 27 %
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – 10 %

Share This News

Related Post

” पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे विचार आठवले नाहीत का ? ” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद रोजच नव्या रूपाने समोर येत असतात. शाब्दिक चिखल फेक सुरू असतानाच…

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘द इंडिया वे’ चा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशित

Posted by - January 24, 2023 0
पुणे : परराष्ट्रमंत्री मा. श्री. एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा ‘भारत मार्ग’ या शीर्षकाने…

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर ; कसा असेल मोदींचा पुणे दौरा ?..जाणून घ्या

Posted by - March 5, 2022 0
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता पुण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता ते…

#PUNE : चुकून टेम्पोचा रिव्हर्स गेअर पडला; तरुण थेट पडला 40 फूट खोल विहिरीत

Posted by - March 23, 2023 0
पुणे : पुण्यात कात्रज कोंढवा रोडवर बुधवारी सकाळी एक विचित्र घटना घडली आहे. वॉशिंग सेंटरवर टेम्पो घेऊन आल्यानंतर चालक टेम्पोच्या…

मुंबईतील अनधिकृत फिल्म स्टुडिओ जमीदोस्त, किरीट सोमय्यांचा ‘या’ नेत्यांवर आरोप

Posted by - April 7, 2023 0
मुंबईतील मढ परिसरात हजारो कोटी खर्च करून उभे करण्यात आलेले फिल्म स्टुडिओ जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *