दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांनी घट

325 0

दिलासादायक बातमी : गॅस सिलेंडर म्हणजे सामान्य माणसाच्या सामान्य गरजांपैकीच एक आहे. अशातच सातत्याने वाढणारे गॅस सिलेंडरचे उच्चांकी भाव पाहता सामान्य माणसाचे एकीकडे कंबरडे मोडले आहे. तथापि एक दिलासादायक बातमी आहे. व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 115 रुपयांनी कमी झाली आहे. अर्थात हा दिलासा सामान्य माणसाला सध्या तरी मिळालेला नाही.

14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. 19 किलो गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 1744 रुपये आहे. तर कलकत्त्यामध्ये 1846 आहे. मुंबईमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1696 आहे. आणि चेन्नईमध्ये 893 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळतो. आता पाचव्यांदा व्यावसायिक गॅस सिलेंडर किमतींमध्ये बदल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याकारणाने सामान्य माणसाला अद्याप कोणताही दिलासा नाही.

सध्या राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1053 आहे. कलकत्त्यामध्ये 1019 आहे. मुंबईमध्ये 1052 तर, चेन्नईमध्ये 1068 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळतो. सहा जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला होता. परंतु त्यावेळी सामान्य माणसाला दिलासा न मिळता या सिलेंडरच्या दरांमध्ये पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!