पुणे : दिवाळीनंतर पावसानं उसंत घेतली पण पुणेकरांची स्थिती सध्या आगीतून फुफाट्यात झाल्यासारखे आहे पावसानं यावर्षी पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर जोडपून काढलं. ढगफुटी सारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिल्यानंतर पुणेकरांसमोर आता कडाक्याच्या थंडीचे आव्हान उभे आहे राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद पुण्यामध्ये करण्यात आली आहे.
पुण्यात बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आला आहे सरासरीच्या तुलनेत तीन पूर्णांक दोन अंशांनी तापमान कमी झाले आहे त्यात ऑक्टोबर हिटने देखील हैराण केले आहे त्यामुळे दिवसा कडक उन्हाचा चटका आणि रात्री कडाक्याची थंडी यामुळे पुणेकर हैराण झाला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
पुणे 12.6
कोल्हापूर 17.7
महाबळेश्वर 13.8
नाशिक तेरा पूर्णांक तीन
सांगली 17.2
सातारा 14.3
रत्नागिरी २२.२
औरंगाबाद 13
परभणी 15.4
नांदेड 16.4
नागपूर 16.8