हैदराबादमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टी उधळली, अभिनेते, राजकीय नेत्यांचा सहभाग

626 0

हैदराबाद- हैद्राबाद मधील उच्चभ्रू वसाहत म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये सुरु असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळून लावली आहे. या कारवाईत पोलिसांनी १४२ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अभिनेता नागा बाबू यांची कन्या निहारिका कोनिडेला, बिग बॉस तेलुगू रिऍलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचा समावेश आहे. निहारिका कोनिडेला ही मेगास्टार चिरंजीवीची पुतणी आहे. गायक आणि बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचाली ताब्यात घेण्यात आले आहे. राहुलने 12 फेब्रुवारी रोजी हैदराबाद पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू केली तेव्हा त्याने थीम सॉंग गायले होते. त्याशिवाय, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आंध्र प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आणि राज्यातील तेलुगू देसमच्या खासदाराचा मुलगा यांचा समावेश आहे.

पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोकेन आणि चरस जप्त केलं आहे. पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र केली आहे. त्यासाठी त्यांनी Hyderabad-Narcotics Enforcement Wing ही सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी एसएचओ शिव चंद्रा यांना हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. त्यांच्या जागी टास्क फोर्सचे के.के. नागेश्वर राव यांनी जबाबदारी देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide