BIG NEWS : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला

260 0

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांचे फोन टॅप केल्याच्या आरोपा खाली रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंद गार्डन पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस तपास सुरू होता. दरम्यान पुणे पोलिसांकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु आज न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला आहे.

दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने पोलीस तपास बंद करण्यासाठीचा रिपोर्ट सादर केला होता. परंतु आज हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

Share This News
error: Content is protected !!