ब्रेकिंग न्यूज ! पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल,काय आहे प्रकरण ?

430 0

पुणे- बेकायदेशीरपणे टेलिफोन टैपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा न्यायालयात वाद सुरु असतानांच या कारवाईमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बेकायदेशीर टेलिफोन टैपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीला २०१५ ते २०१९ या पाच वर्षात फोन टॅपिंग हे अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले आहेत किंवा कसे ? याचा तपास करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार या समितीने पडताळणी केली. त्याची पडताळणीकरून समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यात रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या काळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे नमूद केले आहे.

या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रश्मी शुक्ल या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांकडून फोन टॅपिंग गुन्हा दाखल झाल्याच्या प्रकरणाची गुप्तता पाळण्यात आली आहे.

Share This News

Related Post

बालभारती शिवाय काहीही न वाचलेले देखील विधान भवनात निवडून जातात – राज ठाकरे (व्हिडिओ)

Posted by - February 26, 2022 0
पुणे- बालभारती पुस्तकाच्या शिवाय काहीही न वाचलेली लोकं विधान भवनात निवडून जातात अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा दाटून आले काळे ढग ; महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता

Posted by - September 29, 2022 0
महाराष्ट : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

… आणि शर्यतीमधील बैलगाडी घुसली थेट प्रेक्षकात, रायगडमधील थरारक घटना

Posted by - February 3, 2022 0
रायगड – बैलगाडा शर्यत सुरु असताना अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. ही…

ब्रेकिंग न्यूज ! शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त

Posted by - March 25, 2022 0
मुंबई- एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव…
Uma Shanti News

Pune News : अखेर ! ‘त्या’ प्रकरणी युक्रेनच्या गायिकेने मागितली माफी

Posted by - August 17, 2023 0
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी युक्रेनची गायिका उमा शांतीने एका कार्यक्रमादरम्यान दोन्ही हातात तिरंगा घेऊन नृत्य केले आणि नंतर झेंडा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *