भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने सिंगापूरमध्ये जिंकले सुवर्णपदक

99 0

सिंगापूर- ऑलिम्पिक पदक विजेती आणि भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या यशामुळे ती राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

चानू प्रथमच 55 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेत तिने 191 किलो (86 किलो आणि 105 किलो) वजन उचलले. तिला कोणत्याही खेळाडूकडून आव्हान मिळाले नाही. मीराबाईनंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची जेसिका सेवास्टेन्को आहे. जेसिकाने मीबराबाई खालोखाल 167 किलो (77 किलो आणि 90 किलो) वजन उचलले. त्यानंतर मलेशियाच्या अ‍ॅली कॅसांड्रा एंजेलबर्टने 165 किलो (75 किलो आणि 90 किलो) वजनासह तिसरे स्थान पटकावले.

मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मीराबाईने इतिहास रचला आहे. मीराबाईच्या या यशामुळे भारताचा वेटलिफ्टिंगमधील पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकले होते. मीराबाईने स्नॅच अँड क्लीन अँड जर्क फेऱ्यांमध्ये एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकले होते.

दरम्यान, टोकियो स्पर्धेनंतर आता ही पहिलीच स्पर्धा आहे. ऑलिम्पिकनंतर तिने डिसेंबरमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली होती. 27 वर्षीय चानू कॉमनवेल्थ रँकिंगच्या आधारे 49 किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. मात्र, भारताला आणखी सुवर्णपदके मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी चानूने 55 किलो वजनी गटात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंगापूर वेटलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही यावर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल आठ वेटलिफ्टर्स थेट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.

Share This News

Related Post

महत्त्वाची बातमी : विधानसभा पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

Posted by - November 5, 2022 0
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या पाच आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुका 5…

नदीमध्ये पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला, इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Posted by - April 12, 2023 0
पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत गावाजवळ घडली. मंगळवारी…
Nashik News

Nashik News: नाशिकमधील अंबड रोडवर दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांंचा मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
नाशिक : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक (Nashik News) अशीच एक गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे. या…
Medha Kulkarni

Medha Kulkarni : भाजप मेधा कुलकर्णीची नाराजी करणार दूर; उद्घाटनानंतर नितिन गडकरी त्यांची निवासस्थानी घेणार भेट

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या…

#PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर जोरदार स्वागत

Posted by - January 19, 2023 0
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन झाले.मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *