संतापजनक ! दोन अल्पवयीन मुलांचे चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमधील घटना

768 0

औरंगाबाद- खाऊ देण्याचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलांनी एका दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी पीडित मुलगी कॉलनीत खेळत होती. शेजारीच राहणाऱ्या 13 आणि 10 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला गच्चीवर नेले. तिथे या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. मात्र काय घडलंय हे न कळाल्यामुळे मुलगी रडतच आईकडे आली. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत तिने आईला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आईने त्यांच्या कानावर हा प्रकार घातला.

मुलीला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा साळुंके यांनी चिमुकलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide