9 एप्रिलला ठाण्यात होणार ‘राज’गर्जना

146 0

ठाणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कवर भव्य सभा घेतली होती. या सभेतला गाजलेला मुद्दा म्हणजे मशीदींवरील भोंग्यांचा. मशीदीवरील भोंग्यावरुन राजकारण चांगलचं तापलं असताना राज ठाकरे पुन्हा सभा घेणार आहेत. ठाण्यात ही सभा होणार आहे.

येत्या 9 एप्रिलला ठाण्यात पुन्हा राजगर्जना होणार आहे. यावेळी ते विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. त्यामुळे 9 तारखेच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले होते.

Share This News
error: Content is protected !!