कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत शेट्टी यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. महाविकास आघाडी आणि आमचे सर्व संबंध संपले असे राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे.
