पुणे – एका 54 वर्षीय प्राध्यापकाने एका 27 वर्षीय प्राध्यापिकेला मिठी मारून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील एका महाविद्यालयात घडला असून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (4 एप्रिल) दुपारच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची माहिती अशी की, दहावी-बारावीच्या परीक्षेचे पेपर वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. पुण्यात एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे पेपर तपासल्यानंतर महाविद्यालयातील प्रोफेसर त्याच्याकडे पेपर जमा करत होते.
पेपर जमा करण्यासाठी या प्राध्यापकाकडे 27 वर्षीय प्राध्यापक तरुणी आली असता तिच्या इच्छेविरुद्ध तिला मिठी मारून तिचा विनयभंग केला. य प्रकरणी पीडित प्राध्यापिकेने संबंधित प्राध्यापकाविरुद्ध भारती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्राध्यापकाला अटक केली आहे.