दुसऱ्यांदा सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; उत्तराखंड मध्ये लवकरच समान नागरी कायदा

177 0

डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा केली. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धामी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपाचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मंत्रीमंडळाची काल पहिली बैठक झाली. पहिल्याच बैठकीत समान नागरी कायद्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधित प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. समितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकृत्त न्यायाधीशांचा समावेश असणार आहे . ही समिती राज्यातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहितेचा मसुदा तयार करेल . उच्चाधिकार समिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे , असे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले . 12 फेब्रुवारी रोजी आमच्या सरकारने राज्यात समान नागरी कायदा आणण्याचा संकल्प केला होता, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!