डायरेक्टर… रायटर… अ‍ॅक्टर… आणि आता डॉक्टर !

540 0

एकेकाळी M. Phil. किंवा SET/NET होण्यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारणाऱ्या नागराज मंजुळे यांना पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठानं D. Litt. ही पदवी बहाल केली आणि वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागराज मंजुळेंना डॉ. नागराज मंजुळे बनवलं.
———————-
संदेशप्रधान चित्रपट साकारण्यात हातखंडा असलेला दिग्दर्शक !

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आलीये. पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंड अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती करत मंजुळे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. लेखन, दिग्दर्शनासह विविध चित्रपटांमधून अभिनयही केलाय. सामाजिक आशय डोळ्यांसमोर ठेवून संदेशप्रधान चित्रपट साकारण्यात हातखंडा असलेल्या मंजुळे यांनी आपल्या चित्रपटांतून नेहमी नवख्या कलाकारांना संधी दिली. त्यांच्या चित्रपटांतील पात्रं जणू आपणच असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण होत गेली आणि त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. मंजुळेंच्या ‘सैराट’नं तर अनेक विक्रम मोडीत काढले आणि मराठी चित्रपटाच्या इतिहासात 100 कोटींचा टप्पा पार करणारा तो पहिलाच चित्रपट ठरला. त्याआधी ‘फँड्री’नं प्रेक्षकांना वेड लावलं तर ‘फँड्री’ या चित्रपटासह त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

पहिल्या-वहिल्या हिंदी चित्रपटात थेट बच्चनना घेतलं…

बिग बी अमिताभ बच्चन यांना आपलं ‘रोल मॉडेल’ मानून चित्रपट क्षेत्रात आपली कलाकारी दाखवणाऱ्या मंजुळे यांनी आपल्या पहिल्या-वहिल्या हिंदी चित्रपटात थेट बच्चन यांना घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारलीये. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरूये. नवख्या कलाकारांसह केलेल्या या कलाकृतीचं कैक दिग्गज कलाकारांनी कौतुक देखील केलंय.

जीवनमान ढवळून काढणारा आशय, नेमका व अचूक संदेश देणारी कथा आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून पटकथेला पडद्यावर जिवंत करण्याची हातोटी या सर्व कलांचं मिश्रण म्हणजे नागराज मंजुळे. या अशा प्रतिभावान लेखकाला, अभिनेत्याला आणि दिग्दर्शकाला मानद डॉक्टरेट पदवी बहाल करून डी. वाय. पाटील विद्यापीठानं या हरहुन्नरी कलाकाराचा यथोचित सन्मान केलाय.

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा…

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

Posted by - March 17, 2023 0
पुणे दि.१७-कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९…

ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास, जे जे रुग्णालयात दाखल

Posted by - February 25, 2022 0
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास…

जिओ ट्रू 5G सेवा पुण्यात सुरू; जिओ वेलकम ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना मिळणार अमर्यादित 5G डेटा आणि 1Gbps+ स्पीड

Posted by - November 23, 2022 0
पुणे : जिओ ने 1Gbps पर्यंतच्या स्पीडसह अमर्यादित 5G डेटा लॉन्च केला आहे, आज पुणे रहिवाशांसाठी जिओ ट्रू 5G सेवा…
Crime

पिंपरी चिंचवड शहरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

Posted by - July 24, 2022 0
पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.    दापोडीतील सुंदर बाग कॉलोनी मध्ये ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *