पुणे : आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान

290 0

पुणे : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान च्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक ( पालघर) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.सोमवार, दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता पत्रकार भवन येथे हिंदू महासंघ च्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.

घटना स्थळी रंगे हाथ पकडले गेलेल्या, गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांपुढे मान्य केलेल्या, आणि त्याच आधारावर खालच्या न्यायालयाने 2 वेळा जामीन नाकारल्या गेलेल्या आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्रा बाहेर जाऊन निर्दोष मुक्त केले, असे त्यांनी सांगीतले.

या संपूर्ण घटने विरोधात हिंदू महासंघाने 13 जुलै 2022 रोजी कोर्टात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्रा बाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केली, हे मुद्दे उपस्थित केले.याची पूर्ण 36 पानांची कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात अाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!