पुणे : बस पुढे घेण्याच्या किरकोळ कारणावरून पुणे ग्रामीण पोलिसाने पीएमपी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी पोलिसांनी पीएमपी बस चालकास बेदम मारहाण केली आहे.
बस पुढे घेण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असला तरी रिक्षा चालकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी हा सर्व प्रकार केला असल्याचा आरोप एमपी बस चालकाने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीची वाघोली कारेगाव ही बस रविवारी सायंकाळी कारेगावकडे निघाली असताना, पाबळ फाटा या ठिकाणी पीएमपीच्या थांब्यावर बस उभी करत असताना त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी बस थोडी पुढे उभी करण्यास सांगितलं. त्यावेळी बसमधील प्रवासी चढ-उतार करत होते.
दरम्यान एका रिक्षा चालकाने तिथून बस काढण्यास व चालकाला सुनवण्यास सुरुवात केली. तर हा बस थांबा असल्यामुळे प्रवासी सर्व उतरत नाहीत तोपर्यंत बस जागेवरून हलणार नसल्याचं चालकाने म्हटलं. दरम्यान याच रिक्षा चालकान पोलिसाकडे जाऊन या बसमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितलं. यानंतर या पुणे ग्रामीण पोलिसान बस चालकास बस मधून खाली खेचले आणि पोलीस ठाण्यात चल तुला दाखवतो अशी धमकी देखील दिली असल्याचं चालकाने सांगितल आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये 50 ते 60 पीएमपी बस प्रवाशांना मोठे हाल सोसावे लागले आहेत.