मुंबई : आसाराम बापू यास गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. 2013 साली उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे सविस्तर प्रकरण ,
पिडीतेने दिलेल्या जबाबानुसार, 15 ऑगस्ट 2013 ला तिच्यावर आसाराम बापू यांनी बलात्कार केला होता. 23 ऑगस्ट 2013 ला आसाराम बापूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आसाराम बापूच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध देखील दर्शवला होता. तर कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड देखील केली होती.
28 ऑगस्ट 2013 ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली. या प्रकरणामध्ये आसारामने ती मुलगी मनोरुग्ण असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर यास राजकीय रंग देण्याचा देखील प्रयत्न आसाराम बापू यांनी केला होता. 31 ऑगस्ट 2013 ला आसाराम बापूला जोधपूर पोलिसांनी अटक केली, त्यानंतर पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली होती. नोव्हेंबर 2013 ला जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूंच्या विरोधात आरोप पत्र दाखल केले होते. यामध्ये आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात 7 एप्रिल 2018 रोजी जोधपूर कोर्टात दोन्हीही पक्षांचे युक्तिवाद संपले.