PUNE CRIME : 13 वर्षीय बालिकेवर नामांकित उद्योजकाचा बलात्कार; फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळून देण्याच्या आमिषाने केले कृरकृत्य

944 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आम्हीच दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा नामांकित उद्योजक आहे. तेरा वर्षीय मुलीला त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवून देण्याच आमिष दाखवलं होतं. त्यानंतर ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने या मुलीला कपडे उतरवण्यास सांगितले, आणि त्यानंतर या मुलीवर या नराधामान बलात्कार केला आहे. त्यानंतर जर हे कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी सुद्धा या मुलीला दिली आहे.

बलात्कारानंतर आरोपी उद्योजक फरार झाला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, आरोपी राजेंद्र गायकवाड याच्या विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Share This News
error: Content is protected !!