पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने वंदन ; VIDEO

284 0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने आज बाप्पाला वंदन केले. लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,आणि इंस्टिट्यूट ऑफ योगा पुणे या तीन संस्थांच्या माध्यमातून आज सकाळी सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शाळेतील मुलांनी वंदन केले.

पुण्यातील 7 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यापैकी 2 कर्णबधीर शाळांचा सहभाग होता. एकूण 361 विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या 15 हजार सूर्यनमस्कार गणपतीसमोर वंदन केले.या उपक्रमाचे हे 9 वे वर्ष आहे.

Share This News
error: Content is protected !!