मुंबई : एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्याच्या आत त्या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेणे आवश्यक असतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यामुळे निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 14 ऑक्टोबर पर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर तीन नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. तर सहा नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
दरम्यान शिवसेना आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तथापि निवडणुकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येईल का ? हा मोठा प्रश्न असणार आहे. तर शिंदे गटाने देखील आपला उमेदवार देऊन पोटनिवडणूक लढणार असल्याचं जाहीर आव्हान दिल होतं, तथापि भाजपने आपला उमेदवार दिल्यामुळे या जागेसाठी आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप अशी लढत असणार आहे.