मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव पाहता अनेक वापरकर्त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पसंती दर्शवण्यास सुरुवात केली होती. परंतु आत्तापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांनी दुर्घटना घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यापूर्वी चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक बाइकचा स्फोट होऊन एक संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते.
आता पुन्हा एकदा अशीच एक घटना मुंबईमधून समोर येते आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला चार्जिंग सुरू असताना वसईमध्ये एका स्कूटरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये लागलेल्या आगीत एका सात वर्षीय चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली. शब्बीर शेहनवाज अन्सारी हा चिमुकला या दुर्घटनेमध्ये 70 ते 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या चीमुरड्याची आई देखील या घटनेमध्ये भाजली असल्याचे समजते.