मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन झाले.मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ आणि भूमिपूजनही होणार आहे.
मुंबईत ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एक लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित केले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिकेची बिगुल देखील समजला जातो आहे.
बीकेसीत नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणातून मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांच्या सभेसाठी शिंदे गट व भाजपने जोरदार तयारी सुरु केली. बीकेसी मैदानावर एक लाख कार्यकर्त्यांना अनेक जिल्ह्यातून खाजगी वाहनांनी आणण्यात आले आहे.