#PIMPRI CRIME : 3 महिने रखडलेला पगार मागितला म्हणून महिलेला अमानुषपणे मारहाण; पिंपरी मधील धक्कादायक घटना

659 0

पिंपरी : पिंपरीमधून एक धक्कादाय घटना समोर येते आहे. तीन महिने रखडलेला पगार मागितला म्हणून सफाई कर्मचारी महिलेचे दुकान मालकासोबत वाद झाले. हे वाद एवढे विकोपाला गेले की, या दुकान मालकाने थेट या महिलेला अमानुषपणे मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये महिला जखमी झाली असून, संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या महिलेने निगडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पिंपरी मधील सिटी प्राईड इमारतीमध्ये असणाऱ्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये सफाई करण्याचं काम करतात. याच ऑफिसमध्ये काम करणारे आरोपी हर्षद खान यांनी गेल्या तीन महिन्यांपासून या महिलेचा पगार रखडवला होता. अनेकदा पगाराची मागणी करून देखील देण्यास टाळाटाळ केली.

दरम्यान आज सकाळच्या सुमारास या महिलेने पुन्हा रखडलेला पगार मागितला यावरून दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की हर्षद खान यांनी थेट या महिलेला शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण देखील केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर निगडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर या आरोपीला ताब्यात घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!