ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सुपरस्टार विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानाखाली लगावली (व्हिडिओ)

699 0

लॉस एंजेलिस – सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या १४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला एका घटनेने गालबोट लागले आहे. हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विल स्मिथ याने कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक यांच्या श्रीमुखात भडकावली आहे. ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्याबाबत प्रतिक्रिया दिली. पण ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने थेट स्टेजवर जात रॉक यांच्या कानशिलात लगावली.

रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट केली होती. परंतु जेडा यांनी अलोपेसिया या गंभीर आजारामुळे केस काढले आहेत . पत्नीची चुकीच्या पद्धतीने झालेली ही थट्टा सहन न झाल्याने स्मिथ यांचा पारा भडकला आणि त्यांनी रॉक यांच्या कानाखाली मारली. विलने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर तेथील उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकीत झाले.

ख्रिसने यावेळी पुन्हा माझ्या पत्नीचं नाव नको घेऊस असा दम रॉकला भरला तर रॉकनेही यावेळी त्याला असं करणार नाही अशी हमी दिली. पण हा सारा प्रकार पाहून तेथे उपस्थितांसह टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक देखील शॉक झाले. त्यांनतर ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!