ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सुपरस्टार विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानाखाली लगावली (व्हिडिओ)

515 0

लॉस एंजेलिस – सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या १४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला एका घटनेने गालबोट लागले आहे. हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विल स्मिथ याने कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक यांच्या श्रीमुखात भडकावली आहे. ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्याबाबत प्रतिक्रिया दिली. पण ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने थेट स्टेजवर जात रॉक यांच्या कानशिलात लगावली.

रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट केली होती. परंतु जेडा यांनी अलोपेसिया या गंभीर आजारामुळे केस काढले आहेत . पत्नीची चुकीच्या पद्धतीने झालेली ही थट्टा सहन न झाल्याने स्मिथ यांचा पारा भडकला आणि त्यांनी रॉक यांच्या कानाखाली मारली. विलने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर तेथील उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकीत झाले.

ख्रिसने यावेळी पुन्हा माझ्या पत्नीचं नाव नको घेऊस असा दम रॉकला भरला तर रॉकनेही यावेळी त्याला असं करणार नाही अशी हमी दिली. पण हा सारा प्रकार पाहून तेथे उपस्थितांसह टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक देखील शॉक झाले. त्यांनतर ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

Share This News

Related Post

पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली  : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये…
Amruta Fadnavis and narendra modi

Amruta Fadnavis : PM मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी गायले खास गुजराती भाषेत गाणं

Posted by - September 18, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 73 वा वाढदिवस नुकताच पार पडला. यानिमित्ताने त्यांच्यावर सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री…

महत्वाची बातमी ! कोरोनामुळे आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित

Posted by - May 6, 2022 0
बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या…

ACC आणि अंबुजा सिमेंट कंपन्या गौतम अदानी यांनी केल्या टेकओव्हर

Posted by - May 16, 2022 0
नाव दिल्ली- देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे सिमेंट किंग होणार आहेत. त्यांच्या अदानी समुहाने देशातील दोन…
Nivedita Saraf

निवेदिता सराफ यांना मॉलमध्ये आला ‘हा’ वाईट अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाल्या….

Posted by - June 12, 2023 0
मराठमोळी अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्या मालिकेच्या सेटवरील असो किंवा दैनंदिन जीवनातील अपडेट्स त्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *