10 मे ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे होणार – खासदार रामदास आठवले

671 0

पुणे : 10 मे रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी आज जाहीर केले . काल महाबळेश्वर येथे पक्षाची कार्यकारणी बैठक व चिंतन शिबिर आयोजित केले होते त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आठवले बोलत होते.

पुढे ते म्हणाले की ,लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, विधानपरिषदेत स्थान मिळावे. आमच्या पक्षाला निर्णय प्रक्रियेत विचारात घेण्यात यावे तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका लवकर घ्याव्यात. जेणेकरून जिल्हा आणि तालुका स्तरातील कार्यकर्त्यांना त्यामुळे सत्तेत सहभागी होता येईल. या मागण्यांसाठी आम्ही देवेंद्र फडणवीस व भाजपा चे वरिष्ठ नेते यांना भेटणार आहोत.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शिवशक्ती व भीमशक्ती युती म्हणता येणार नाही. कारण खरी भीमशक्ती आमच्यासोबत आहे .त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर यांची युती यशस्वी होणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले .

भाजपा संविधान बदलणार या अफवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान टीकवणारे आहेत. त्यांनी अनेक योजना दलित समाजासाठी आणल्या आहेत. तसेच इंदू मिल स्मारक अथवा इतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे विषय तत्काळ मार्गी लागत आहेत .त्यामुळे खरी भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर , शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे , प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव ,विशाल शेवाळे ,युवक अध्यक्ष विरेन साठे यासह पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

Share This News

Related Post

Maharashtra Politics : फडणवीसांचा शपथविधी बेकायदेशीर – काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे पाटील

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेली ‘शपथ’…

पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांची बदली; संदीप कर्णिक पुण्याचे पोलीस सहआयुक्त

Posted by - April 20, 2022 0
पुण्याचे पोलीस सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

Posted by - March 4, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना बंदी…

बाळासाहेब ही म्हणाले असतील शाब्बास संजय!; केदार दिघे यांचं ट्विट चर्चेत

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून संजय राऊत यांच्यावर…
Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Posted by - March 28, 2024 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात मागच्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात कोयता गॅंगची (Pune Koyta Gang)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *