पुणे- पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनचे बी ए 2 चा उपप्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा व्हेरीयंट बदलायला सुरुवात झाली का ? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. निलेश गुजर यांनी चार मुलांचे अहवाल पाठवले होते. त्यापैकी दोन मुलांमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार आढळून आला आहे. याबाबत
डॉ. निलेश गुजर यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संक्रमण झाले आहे. याच काळात माझ्या क्लिनिकमध्ये काही पॉझिटिव्ह पेशंट आढळले, त्यानंतर मी एन आयव्हीहिच्या पोतदार मॅडमला त्यांचे जिनोमिग सिक्वेन्स करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे चार रुग्णांचे जिनोमिग सिक्वेन्स केल्यानंतर असे आढळून आले की त्या चारही जणांमध्ये ओमिक्रॉनचा बी ए 2 नावाचा व्हेरियंट आढळून आला आहे.