Railway

टीसीमागे फिरण्याची कटकट मिटली; आता मोबाईलवरच मिळणार कन्फर्म तिकिट

3269 0

पुणे : रेल्वेचं कन्फर्म तिकीट (Confirm ticket) प्रवाशांकडे नसलं की मग टीसीच्या (TC) मागे-मागे फिरावं लागतं आणि प्रवाशांची प्रचंड चीड-चीड व्हायला लागते. मात्रा आता असं करण्याची प्रवाशांना गरज पडणार नाही. कारण आता प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या आरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवर ट्रेनचा चार्ट मिळवण्याची सुविधा आहे.

मात्र मोबाईलवर ही माहिती मिळत नाही आणि त्यामुळे प्रवासी टीसी वर अवलंबून असतात.आता कोणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत ही माहिती प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवीन सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मात्र या सुविधेसाठी प्रवाशांना किती शुल्क लागेल याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या सुविधेमुळं प्रवाशांना होणारा मनस्ताप हा कमी होणार आणि वेळ ही वाचणार हे मात्र नक्की.

Share This News
error: Content is protected !!