पुणे : डीआरडीओचे (DRDO) संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
या प्रकरणात प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांनी ईमेल द्वारे काही महत्त्वाची माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर हे एका ईमेल आयडीचा वापर करायचे अशीदेखील माहिती तपासात उघड झाली आहे. तसेच कुरुलकर हे चक्क डीआरडीओ येथील गेस्ट हाऊस मध्ये काही महिलांना भेटत होते असेदेखील समोर आले आहे.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
डीआरडीओ संचालक आणि शास्त्रज्ञ असलेले प्रदीप कुरूलकर हे 2022 पासून पाकिस्तानी एजेंट्सच्या संपर्कात होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने(ATS) कुरुलकर यांना गोपनीयता कायद्याअंतर्गत त्यांना पुण्यामधून अटक करण्यात आली होती.