मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू देखील मांडण्यात आली आहे.
नुकतेच आयोगाच्या कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आपलं म्हणण मांडण्यासाठी बोलावण्यात आल होत. स्वतः राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे आयोगाच्या कार्यालयातून जाऊन आले असून या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच निवडणूक आयोगाच्यावतीने याआधी मायावती यांचा बसप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनाही 2019 साली निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महाराष्ट्रासह नागालँड, केरळ आणि झारखंड या राज्यात आहेत. तसेच निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी शर्थी पूर्ण करत असल्यामुळे आम्हांला अडचण नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. मात्र निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.