राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी शेअर केला नागपूरच्या आमदार निवासातील शौचालयात कपबशा धुण्याचा व्हिडिओ… वाचा काय आहे प्रकरण

350 0

नागपूर : सध्या सुरू असलेले नागपूर हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी नागपूर आमदार निवासातील शौचालयात कपबशा धुण्याचा व्हिडिओ ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.

या व्हिडिओमध्ये एक वेटर शौचालयात कपबशा धुवत असल्याचे दिसत आहे. त्यावरून आमदार अमोल मिटकरींनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. कोविडमुळे दोन वर्षे नागपूर हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. दोन वर्षांनंतर नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे देखभाल, दुरुस्तीसाठी कोटींची निविदा काढण्यात आली होती. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला देऊनही आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार यांनीही हा प्रकार गंभीर असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!