नक्षलवादी हल्ला : महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; दोन जवान शहीद, एक जखमी

444 0

छत्तीसगड : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या राजनांदगाव या ठिकाणी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये दोन जवान शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी दोन दुचाकी देखील पेटवून दिल्याची माहिती मिळते आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, छत्तीसगडच्या राजनांदगाव या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. राजनांदगाव जिल्ह्याच्या बोरतरलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गोंदिया-महाराष्ट्र सीमेवरील चेक पोस्टवर अचानक नक्षलवाद्यांनी जंगलातून येऊन हल्ला केला. या गोळीबारामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये राजेश हवलदार आणि ललित आरक्षक हे जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी आहे.

चेक पोस्टवर वाहनांच चेकिंग सुरू असताना अचानक या नक्षलवाद्यांनी जंगलातून येऊन गोळीबार केला. तर दोन दुचाकींना आग देखील लावली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त बळ घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!