पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर, मेट्रो मार्गाचे होणार उदघाटन

335 0

पुणे- पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी शहरातील महत्वाच्या प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. तसेच नदीकाठ सुधार प्रकल्प, एक हजार घरांची लॉटरी, ईबसेसचे लोकार्पण यासह इतर कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

निवडणुकीपूर्वी मेट्रोमध्ये बसण्याचे पुणेकरांचे स्वप्न साकार व्हावे यासाठी प्रयत्न सुरु होते. हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मागील महिन्यात फुगेवाडी ते पिंपरी हा मार्ग सुरु करण्यास अंतिम मान्यता मिळाली आहे. तर पुण्यात वनाझ ते गरवारे महाविद्यालय या मार्गाची शेवटची तपासणी शिल्लक असून मार्च महिन्यापर्यंत त्याला देखील मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!