मुंबईत मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, राज ठाकरे सुरक्षित ( व्हिडिओ )

170 0

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळल्याची घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ही घटना घडली आहे. या व्यासपीठावरून राज ठाकरे भाषण देणार होते. राज ठाकरे व इतर नेते सुरक्षित असून या अपघातात कोणालाही फारशी दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

आज मुंबईत चांदिवली आणि गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांदिवली येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे हे गोरेगाव पूर्व येथे दाखल झाले. यावेळी स्थानिक पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी होती. राज ठाकरे येणार असल्याने स्टेज बांधण्यात आला होता. मात्र, हाच स्टेज कोसळला. क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यामुळे हा स्टेज कोसळला असल्याचं बोललं जात आहे.

स्टेज कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच काळजी घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी भाषण सुद्धा केलं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले.

Share This News

Related Post

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन ; गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - February 19, 2023 0
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास…

पुणेकरांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला ; कोणत्या धरणांत किती पाणीसाठा ? पाहा VIDEO

Posted by - August 16, 2022 0
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांचा एकूण साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं पुणेकरांचा वर्षभराचा…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

Posted by - September 20, 2022 0
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…

#PUNE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण

Posted by - February 3, 2023 0
पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोठे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *