नागपूर- एवढे महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही अशी खंत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपुरात सरिता कौशिक यांच्या “बेटर दॅन द ड्रीम.. अ पीपल्स स्टोरी” या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
देशात हजारो किलोमीटरचे उत्कृष्ट महामार्ग बांधणारे मंत्री आपल्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप बंधू शकलेले नाहीत. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, एवढं महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही असे गडकरी म्हणाले. अवघ्या दोन किमीचा रस्ता बांधताना लोकांच्या सततच्या तक्रारींमुळे गेले अनेक वर्ष घरासमोरचा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही.
लोकं किती तक्रारी करतात आणि न्यायालय ही त्यांच्यावर निर्णय देताना किती कालावधी लावतो याचा विचार होण्याची गरज आहे. माझ्या घरासमोरचा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे मी गेले सहा वर्ष माझ्या जन्मस्थान असलेल्या महालात राहत नाहीये अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आता महालातला तो रस्ता पूर्ण करू शकत नसल्यामुळे इतर दोन रस्त्यांचे काम सुरु करण्याचे ठरवले आहे असे गडकरी यांनी सांगितले.