#MURDER : दिल्लीमध्ये पुन्हा भयंकर हत्याकांड ! पुन्हा तरुणीची हत्या, फ्रिजमध्ये लपवला होता मृतदेह…

769 0

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांडाने देश हादरला होता. तिच्या प्रियकराने तिची क्रूरतेने हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून नवीन फ्रीज विकत घेऊन त्यामध्ये ते तुकडे ठेवले, आणि एकेक करून या तुकड्यांची विल्हेवाट लावली होती. हे हत्याकांड अद्याप पूर्णपणे संपले नसताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे.

35 तुकडे केले,18 दिवस फ्रीजमध्ये ठेवले; मुंबईतील तरुणीची प्रियकराने ...

पोलिसांना दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका धाब्याच्या फ्रीजमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर तपासाची सूत्रे फिरली आणि त्यानंतर साहिल गहलोत या 25 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आल आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह धाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार कश्मीरी गेट आयएसबीटी जवळ कारमध्ये या मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आणि त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून नेमकी हत्या का करण्यात आली याचा तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!