‘जग्गु आणि जुलिएट’ची सगळीकडे हवा, चित्रपटाला जोरदार प्रतिसाद – ‘पुनित बालन स्टुडिओज्’ची निर्मिती

587 0

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत फक्त ‘जग्गु आणि जुलिएट’चीच चर्चा ऐकू येत आहे. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीस पडला आहे, हे हाऊसफुल थिएटर्स बघूनच लक्षात येतंय. पुनित बालन स्टुडिओज् प्रस्तुत ‘जग्गु आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेमाचे वेगवेगळे अंग उलगडणारं कथानक आणि चित्रपटातील उत्तराखंडमधील मनोहारी दृश्य यांमुळे चित्रपट अधिकच चर्चेत आहे.

‘जग्गु आणि जुलिएट’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट कसा असेल याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, प्रेक्षक ज्या भरघोस पद्धतीने चित्रपटाला प्रतिसाद देत आहेत, त्यावरून असं दिसून येतंय की, चित्रपट मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला आपली पसंती दिली आहे. चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तो लोकप्रिय होतोय. अजय-अतुलची म्युझिकल ट्रीट, दिग्दर्शक महेश लिमये यांचं नयनरम्य छायांकन आणि दिग्दर्शन आणि चित्रपटातील तगडी स्टारकास्ट य़ामुळे चित्रपटाला गर्दी होत आहे. तसेच चित्रपटातील सेलिब्रेटीही थिएटर्समध्ये जाऊन प्रेक्षकांना भेटत आहेत. ‘भावी आमदार’ या गाण्यावर प्रेक्षक ठेका धरत आहेत. कुटुंबातील सर्वजण हा चित्रपट आनंदाने एंजॉय करत आहेत, आणि स्वतःला शोधू पाहात आहेत.
अमेय-वैदेहीसोबतच ऋषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित झाली आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गु आणि जुलिएट’ नक्की बघा!

Share This News

Related Post

मेरा पती सिर्फ मेरा है म्हणत सीमा हैदरनं शेजारणीला दाखवला जोरदार इंगा

Posted by - August 19, 2023 0
पाकिस्तानि सीमा हैदरचा शेजारणीशी सोबत जोरदार राडा. सध्या जोरदार चर्चेत असणारी आणि भारतात बेकायदशीररित्या प्रवेश घेणारी सीमा गुलाम हैदर आता…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली संजय राऊत यांचे भेट

Posted by - November 11, 2022 0
मुंबई : तब्बल तीन महिन्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जामीनावर सुटले आहेत. ईडीच्या कार्यप्रणालीवर न्यायालयाने…
Ashadhi Ekadashi 2023

Ashadhi Ekadashi 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली विठ्ठलाची शासकीय महापूजा

Posted by - June 29, 2023 0
पंढरपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने (Ashadhi Ekadashi 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठलाची शासकीय महापूजा केली (Ashadhi Ekadashi 2023) यावेळी…

शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांची ‘ती’ टेस्ट खोटी, पीडित तरुणीचा आरोप

Posted by - March 31, 2022 0
पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. या प्रकरणी कुचिक यांच्या विरोधात गुन्हा देखील…

एक होतं वायनाड’: निसर्ग कोपला! केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू तर चार गावं गेली वाहून

Posted by - July 31, 2024 0
सध्या सुरू असणाऱ्या सततच्या पावसाचा मोठा फटका केरळमधील वायनाडला बसला असून या ठिकाणी चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन होऊन त्यात मुंडक्काई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *