Municipal elections : पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आता 2017 नुसारच चार सदस्यांची प्रभाग रचना असणार आहे . शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका निवडणुकीसाठी मोठा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे.
त्यामुळे सध्या तीनच्या प्रभाग रचनेनुसार सुरू असलेली निवडणुकीची तयारी वाया जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यांची प्रभाग रचना करून आपल्या सोयीनुसार मतदारसंघ केल्याचा आक्षेप होता. तसेच अनेक महापालिका प्रभागांची संख्या देखील महाविकास आघाडी सरकारने वाढवली. ही संख्या देखील कमी करण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमबाह्य पद्धतीने वाढवलेली सदस्य संख्या त्वरित रद्द करावी या मागणीचा निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं होतं.
महाविकास आघाडी सरकारने वाढविलेले वाढ संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करून ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती त्याचप्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्डर रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत त्यामुळे अनेक इच्छुकांचा खर्च वाया जाणार आहे